Home सामाजिक वाचन कट्याने रुजविली वाचन संस्कृती

वाचन कट्याने रुजविली वाचन संस्कृती

1093

नागभीड : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती वर्षाचे औचित्य साधुन जि.प. कोटगाव शाळेत निसर्गरम्य वातावरण निर्माण केलेला वाचन कट्टा व त्यामधुन निर्माण झालेली विद्यार्थी वाचनाची गोडी निश्चितच वाचन संस्कृती वृद्धींगत करणारी ठरली. ‘दिसामाजी काहीतरी वाचावे’ या समर्थ रामदास स्वामीच्या उक्तीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांत देखील वाचन संस्कृतीची पाळेमुळे खोलवर रुजविण्याकरिता ‘वाचन कट्ट्याच्या’ रुपाने नविन प्रयोग यशस्वीपणे राबविण्यात आला.
ग्रंथालयाच्या चार भिंतींत वाचनाचा मनस्वी आनंद विद्यार्थ्यांना मिळत नाही. यावर नैसर्गिक स्वछंद वातावरणात वाचन प्रभावी करण्याकरिता प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळांनी प्रामाणिकपणे ग्रामीण संस्कृतीला साजेशी उपलब्ध साधनाचा वापर करुन आकर्षक वाचन कुटीची उभारणी केली.

.      डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या महिन्यात खरा वाचन दिन जिल्हात साकारला तो या वाचन कट्ट्याच्या उभारणीतुन संकल्पना जिल्हात यशस्वीपणे वाचन कट्ट्याच्या रुपाने वाचन संस्कृीला पोषक ठरली.

.      आज वाचन कट्टयामध्ये विद्यार्थी स्वतःहुन प्रेरीत होऊन वाचण्यास तयार झालेला आहे. कुतुहलाने चिमुकले ग्रंथालयापेक्षा वाचन कट्ट्यात रममाण होत आहेत. मुक्त शैक्षणिक वातावरणात शिक्षणाचे धडे गिरविले जात आहेत. वाचन कौशल्य वृद्धीगत करण्यास वाचन कट्टा पोषक ठरत आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व्हावा या उदात्त हेतुने ज्ञानरचनावाद डिजीटल शाळा, चळवळ, कृतीयुक्त शिक्षण यासारखे उत्तुंग दर्जेदार प्रयोग जिल्हा प्रकर्षाने राबवुन उत्कर्षाची गुढी उभारत असतांना त्यात आणखी जोड दिली. वाचन कट्ट्याच्या रुपाने आज संपुर्ण महाराष्ट्राला या नवनविन प्रयोगाची दखल घेण्यास भाग पाडत आहे.

.      विद्यार्थी गुरुच्या शिक्षण कुटीत अध्ययनास जायचे. त्याचप्रकारे चित्राचे रेखाटन आज शाळेत तयार झाले. लहानग्या विद्यार्थ्यांना आवडेल अशा वाचन कट्ट्याची निर्मिती ग्रामस्थ पालक, शिक्षक, विद्यार्थी यांनी स्वतःहुन केल्याने खरी आत्मीयता निर्माण झाली. आपण निर्माण केलेला वाचन कटटा त्याचा उदात्त हेतु विद्यार्थ्यांना स्वतःहुन उमगला त्यामुळे त्याचे महत्व वर्णन करण्याची गरज उरली नाही. उभारालेला वाचन कट्ट्यात आपण वाचन करायलाच पाहिजे ही जवाबदारी विद्यार्थ्यावर आपसुकच निर्माण झाली. मुक्त वातावरणातील सर्वात महत्वपुर्ण फायदा तो म्हणजे तणावरहित वाचन करण्याचा आनंददायी वाचनाचा उदगम यामुळे निर्माण झाला. विद्यार्थी जितका वाचेल तितकाच प्रभावी बोलेल. ग्रामीण जि.प.शाळेचा विद्यार्थी आज धिटाईन आपली मते प्रदर्शीत करत आहे. मोबाईल संस्कृतीच्या युगात वाचन हद्दपार होण्याची भिती वाचन कट्ट्यामुळे नाहिशी होण्यास मदत झाली. विद्यार्थी निरामय आनंदाने, प्रगल्भतेने वाचन करत असल्याचे बघुन अधिकारी, पालक समाधानी झाल्याचे दिसत आहे.

.     जिल्हामध्ये शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटलेली असुन प्रत्येक मुल शिकलं पाहिजे या भावनेने प्रेरीत होऊ शिक्षण रममाण होऊन, विद्यार्थी विकासाचे धडे गिरविण्यात तल्लीन झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. खरंच एखादे काम मनापासुन केले तर यश नक्कीच दुर नाही. वाचन कट्ट्याची गंगोत्री अविरत वाहण्यास जिल्हातील. पोषक शैक्षणिक वातावरण नक्कीच ‘मैलाचा दगड’ ठरणार.

                                  राहुल कळंबे,                                                                          सहा. शिक्षक                                                   जी. प. शाळा कोटगांव ता. नागभीड जी. चंद्रपूर,                                        मो. नंबर 9284235309

error: Content is protected !!