गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन
वरोरा : तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण बुधवार, दि. ५ मार्च रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालू उताणे होत्या, तर उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर वसंतराव विधाते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदा जिवतोडे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी भोयर उपस्थित होते.
. ग्रामपंचायत भवन लोकार्पण सोहळ्यास ग्रामपंचायत सचिव घारगे, उपसरपंच सचिन बुरडकर, सदस्य आकाश उताणे, प्रवीण परचाके, अंजू लांडे, शीतल गमे, अनिता झाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदासपाटील कष्टी, पत्रकार आशिष घुमे यांची उपस्थिती होती.
. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू, असे आश्वासन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले. गावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायत भवन लोकार्पण सोहळ्यात ग्रामपंचायत सचिव सचिन घारगे यांनी गावाच्या विकासाचा आराखडा वाचून दाखविला, तर वसंतराव विधाते यांनी आपल्या मनोगतातून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा उमरे यांनी केले, तर आभार उपसरपंच सचिन बुरडकर यांनी मानले. यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.


