Home विशेष कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी

कर्जमाफीच्या प्रतीक्षेत शेतकरी

1066

बँका, सोसायट्यांच्या कर्जाचा वाढतोय आलेख

वरोरा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुती सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची घोषणा केली. घोषणाच नव्हे तर, सरकार सत्तेत आले की तत्काळ कर्जमाफी करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटले तरीही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी करण्यात आली नाही. त्यामुळे महायुती सरकारवर शेतकरी नाराज असून शेतकऱ्यांच्या डोक्यावरचा बँक आणि सोसायट्यांच्या कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे.

.   संपुर्ण राज्यासह वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीसह शेतीपूरक गरजा भागवण्यासाठी बँका व सोसायट्यांकडून कर्ज घेतली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, असे
आश्वासन दिल्याने महायुती सरकारला शेतकऱ्यांने अक्षरशः डोक्यावर घेत महायुती सरकारच्या सत्तास्थापनेचे स्वप्न पूर्ण केले. सरकारने केलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे आता कर्जमाफी होणार अन् डोक्यावरचा कर्जाचा बोजा उतरणार, या आशेवर शेतकरी राहिले. या प्रक्रियेत बराचसा काळ लोटल्यामुळे बँका आणि सोसायट्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा
लावला. परंतु महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांनी कर्जमाफीची प्रतीक्षा करीत विविध बँका आणि सेवा सोसायट्यांचे कर्ज भरण्यास टाळाटाळ केली.

.       याचाच परिणाम म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. त्यातच आता बँका आणि सोसायट्यांपुढे कर्ज वसुलीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. यापूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन देऊन कर्जमाफीही दिली. त्यामुळे शेतकऱ्यांचा सरकारवरचा विश्वास अधिक दृढ झाला होता. परंतु सरकार पुन्हा सत्तेत आले. आता सरकारकडून कर्जमाफीचे कसलेच संकेत दिसून येत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

error: Content is protected !!