वरोरा : लोकशिक्षण संस्था, द्वारा संचालित, लोकमान्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दि.25 फेब्रुवारी ला स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मरणोत्तर नेत्रदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य, डॉ. जयश्री शास्त्री होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. वंदेश शेंडे व डॉ. विवेक मसराम(नेत्रचिकित्सा अधिकारी,उप-जिल्हा रुग्णालय, वरोरा) होते. मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया, सामाजिक फायदे, या प्रक्रियेतील अडचणी, कुटुंबातील सभासदांचे सहकार्य, अवयवदानातील सर्वात महत्त्वाचे घटक, भारतीय समाजातील अवयवदानाबाबत जागरूकता, अशा विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
. याप्रसंगी डॉ. जयश्री शास्त्री (प्रभारी प्राचार्य,लोकमान्य महाविद्यालय,वरोरा) यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची विज्ञानानिष्ठता, शिक्षकांचे शिक्षक पेशातील दृष्टीदान तसेच रक्तदान,नेत्रदान,आरोग्य यासंदर्भातही मार्गदर्शन केले.
. या कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेविका प्रगती हजारे, प्रस्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. रवींद्र शेंडे (कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना) तर आभार निशा कौरासे यांनी केले. या नेत्रदान जनजागृती व्याख्यान कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, डॉ. श्रीकांत पुरी, (सहकार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना) बंडू पेटकर तसेच रा. स. योजना स्वयंसेवकांचे सहकार्य मिळाले.


