Home सामाजिक लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

लोकमान्य महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

1104

वरोरा : लोकशिक्षण संस्था, वरोडा द्वारा संचालित लोकमान्य महाविद्यालय वरोरा अंतर्गत विज्ञान विभागाद्वारे दि.28 फेब्रुवारी 2025 ला राष्ट्रीय विज्ञान दिवस कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले.

.     याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आनंद निकेतन महाविद्यालयाचे डॉ. प्रशांत वाघ तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री उपस्थित होत्या. यावेळी डॉ.प्रशांत वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनवर कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना सुलभ तंत्रज्ञानातून अवजारांचा शोध लावून उपयोगी पडणारी अवजारे कशी बनवावी यांचे मार्गदर्शन केले तसेच विज्ञान व समाज यांना जोडण्याविषयी माहिती दिली आणि वैज्ञानिक प्रगती बद्दल विद्यार्थ्यांना प्रेरित केले. डॉ.जयश्री शास्त्री यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान दिवसाचे महत्त्व पटवून दिले.

.      कार्यक्रमाचे संचालन प्रा. वैशाली बदखल व प्रास्ताविक प्रा. योगिनी लोणकर यांनी केले. तर आभार प्रा. माधुरी गहूकर यांनी मानले. या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!