Home सामाजिक एक दिवस दप्तराविना विद्यार्थ्याच्या कल्पकतेकरिता

एक दिवस दप्तराविना विद्यार्थ्याच्या कल्पकतेकरिता

1101

आनंद मेश्राम

  नागभीड : दप्तराने शाळा तर दररोज भरते पण महिण्यातुन एक दिवस दप्तरमुक्त शाळा व मनाला वाटेल ते खेळ मनोरंजन, वाचन, स्वछंद आनंद यामधुन निर्माण केला या दप्तराविना एक दिवस या यशस्वी उपक्रमाचे जि.प.कोटगाव शाळेने या सत्रात हा उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांना अनोखा आनंद देऊन मुले कल्पक बनवुन त्यांचे भावविश्व प्रगल्भ केले.

.      दप्तरविना शाळा हे नांव ऐकुनच काहीसे वेगळे वाटते नानाविध प्रश्नांची सरबत्ती डोक्यात सुरु होते. परंतु या उपक्रमाची सर्व संकल्पना समजल्यानंतर खरंच याप्रकारे सुद्धा आनंददायी शिक्षणाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविला येते ही सिद्ध करुन दाखविले शनिवारी एक दिवस विद्यार्थ्यांच्या आनंदाचा कसा होणार याचा विचार करुन संकल्पना समोर आणली ती ‘दप्तराविना शाळेची’मुलगा दररोज शिक्षकांच्या आवडीप्रमाणे शिकतो. परंतु एक दिवस विद्यार्थ्याला देखील आववडीप्रमाणे शिकायला आवडेल, त्याला निखळ आनंद मिळेल ही बाब हेरुन या उपक्रमाला उदंड प्रतिसादाने तालुक्यात नव्हे तर जिल्हाभर सुरुवात झाली.’नो दप्तर फुल एज्युकेशन’ असे असुन या दिवशी विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे पुस्तक वाचन, मैदानी खेळ, इंडोर गेम, विविध स्पर्धा, मातीकाम, कागदकाम, रंगकाम, प्रश्नमंजुषा, संगणक हाताळणे, उदयोगान भेटी, कार्यालय भेट यासारखे नानविध उपक्रमात, विद्यार्थी आवडीप्रमाणे सहभागी होणार, शिक्षकाला त्यांना साधनांची उपलब्धता करुन दयायची असुन पर्यवेक्षणाची, सहकार्याची भुमिका पार पाडायची आहे. यामधुन ज्या विद्यार्थ्यांत जे कौशल्य आहे ते लगेच समोर येणार, ज्यादिवशी लहान मुलांस दप्तर आणायचे नाहीं तो दिवस त्यांच्याकरिता सर्वात आनंदाचा असतो. विद्यार्थी रममाण होऊन कृती करतांना बघुन सर्वानाच आनंद वाटतो.

.      विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हे पालकच नाही तर शाळेसाठी देखील मोठी डोकेदुखी ठरली आहे. शासनाने तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन प्रमाणच निश्चित केले. या पत्रकाला दप्तराविना एक दिवस हा उपक्रम नक्कीच मदतगार ठरणार. संपूर्ण महिनाभर तेच ते पुस्तके, अध्ययन, अध्यापन या चाकोरीबद्ध चौकटीतुन बाहेर निघुन आननदायी उपक्रमातील विद्यार्थी कसा शिकतो. याचा विचार या उपक्रमात केलेला आहे. या उपक्रमामुळे आपल्या शाळेत देखील काहीतरी वेगळे होत असते असे मुलांना समजुन विद्यार्थी शाळेप्रती आकृष्ट होतो. संशोधकानुसार मुले आपल्या आवडीने गतीने शिकतो. प्रत्येक मुलाची शिकण्याची पद्धत वेगळी ज्याला ज्यामध्ये आवड आहे त शिक्षण त्याला मिळायला पाहिजे असे सप्रमाण सिद्ध झालेले आहे. अभ्यासात कमकुवत विद्यार्थी मैदानी खेळात, गायनात, चित्रकामात अव्वल असु शकतो.
आज या उपक्रमाने विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रती लळा लागुन विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण देखील वाढणार. कोटगाव शाळेने सुरु केलेले उपक्रम हे संपुर्ण शिक्षकासाठी नक्कीच दिशादर्शक राहणार. शाळा दप्तराविना पण शिक्षण कृतीयुक्त ही संकल्पना नक्कीच यशस्वी होऊन शिक्षण क्षेत्रात नवा सुवर्ण इतिहास लिहिण्यास दखलपात्र नक्की ठरणार.

शाळा, दप्तर, परंपरागत शिक्षण यासर्व चाकोरीतुन बाहेर निघुन विद्यार्थ्याच्या स्व. कौशल्याला वाव देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन प्रयोगिक स्तरावर वर्ग १ ते ४ च्या जिल्हा परिषद शाळाकरिता राबविला जाणारा हा उपक्रम नककीच भरघोस यशस्वी होऊन विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीला पोषक ठरुन दैदिप्यमान आनंद देणारा ठरणार, ‘शाळा दप्तराविना शिक्षण कृतीयुक्त’ ही संकल्पना यशस्वी होऊन याची व्याप्ती नक्कीच वाढणार.                                                                                                                                                                                                               राहुल करंबे,                                                                 सहा. शिक्षक, जि. प. कोटगांव

error: Content is protected !!