Home शैक्षणिक जिल्हास्तरीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन

जिल्हास्तरीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन

1072

भद्रावती : एमकेसीएल चे स्थानिक लीड सेंटर (एलएलसी) चंद्रपूर तर्फे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर दि 28 फेब्रुवारी ते 2 मार्च पर्यंत 3 दिवस प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर येथील यंग रेस्टॉरंट, जनता कॉलेज जवळ, चंद्रपूर येथे सुरुवात झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व एमकेसीएल चे अधिकृत केंद्राचे संचालक व प्रतिनिधी करिता हे प्रशिक्षण घेण्यात येत असून संगणक प्रशिक्षण कोर्स मध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय प्रामुख्याने शिकवणे बंधनकारक आहे.

.         या प्रशिक्षण सत्राकरिता चंद्रपूर चे जिल्हा समन्वयक लक्ष्मीकांत कांबळे तिन्ही दिवस उपस्थित राहणार आहे.  प्रशिक्षण चे जिल्हा प्रशिक्षक म्हणून नफिस अहेमद कार्य सांभाळत असून सर्व केंद्रांना कृत्रिम बुद्धिमत्ता चे प्रात्यक्षिक सोबत प्रशिक्षण देणार आहे. बदलत्या तांत्रिक युगात रोजगाराच्या संधी करिता कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या विषयाचे सुद्धा महत्व वाढले आहे.

error: Content is protected !!