Home सामाजिक पळसगाव येथे मुख्याध्यापक प्रेमानंद म्हैसकर यांचा सेवानिवृत्त सत्कार

पळसगाव येथे मुख्याध्यापक प्रेमानंद म्हैसकर यांचा सेवानिवृत्त सत्कार

1111

जन्मदिनीच सेवानिवृत्ती

नेरी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळसगाव येथील मुख्याध्यापक प्रेमानंद म्हैसकर हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. योगायोगाने त्यांचा जन्म दिवस आणि सेवानिवृत्ती एकाच दिवशी आल्याने पळसगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात सेवानिवृत्तीपर सत्कार, आणि वाढदिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती अध्यक्ष प्रकाश ढोक हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महादेव पाटील, जनार्धन देहारे शिक्षक, कोंडीबा केंद्रे, आदित्य पेनोरे, मोनाली गेडाम, विजया ठवरे, अंगणवाडी सेविका, शिला मोहुर्ले, संघमित्रा खोब्रागडे रामकाला पाटील, प्रियंका गोरडवार, अतिशा चौधरी,सुनीता पाटील आदी उपस्थित होते.

.    यावेळी उच्च श्रेणी मुख्याध्यपक म्हैसकर यांचा शाल व भेटवस्तू प्रदान करून सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या जीवन चरित्र्यवर मार्गदर्शन केले. शाळेतील लहान बालकांनी पैसे गोळा करून मुख्याध्यापक यांच्या छोटेखाणी सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला. कर्तव्यशील शिक्षक आपल्या शाळेतील मुलांना सोडून जातं असल्याने विध्यार्थीच्या डोळ्यात अश्रूचा धारा बघ्यावयास मिळाला. मुख्याध्यपक म्हैसकर हे दररोज सकाळी ८ वाजता शाळेत येऊन विध्यार्थीचा वर्ग नियमित घेत होते. त्यांचे शैक्षणिक वातावरण पाहून गावातील पालक वर्गाच्या डोळ्यात अश्रू आले होते. या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन शिक्षक कोंडीबा केंद्रे यांनी केले, प्रस्ताविक देहारे शिक्षक, तर मोनाली गेडाम यांनी आभार मानले.

error: Content is protected !!