Home सामाजिक पळसगाव (जाट) येथे तहसीलदार यांचा तक्रार निवारण कार्यक्रम

पळसगाव (जाट) येथे तहसीलदार यांचा तक्रार निवारण कार्यक्रम

1114

सिंदेवाही : शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्या, त्यांच्या समस्यांचे निवारण व्हावे, त्यांना शासकीय योजनांची माहिती तत्काळ प्राप्त व्हावी, यासाठी शुक्रवारी ग्राम पंचायत पळसगाव ( जाट) येथे मुख्यमंत्री १०० दिवसाचा ७ कलमी कार्यक्रम अंतर्गत सिंदेवाहीचे तहसीलदार संदीप पानमंद यांचे अध्यक्षतेखाली क्षेत्रभेट तथा तक्रार निवारण कार्यक्रम घेण्यात आला.

.     सदर कार्यक्रमात ऍग्रीस्टॉक नोंदणी पाणंद रस्ता अतिक्रमण,इ-पीक पाहणी,इ-फेरफार अदालत, पंतप्रधान किसान सन्मान योजना इत्यादी बाबत  तहसीलदार संदीप पानमंद यांनी माहिती दिली. यावेळी विविध प्रकारचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.  तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून तक्रार निवारण करण्यात आले.

.     सदर कार्यक्रमाला सरपंच जगदीश कामडी, उपसरपंच  संतोष गायकवाड, पोलीस पाटील सुभाष कोलते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन ग्राम पंचायत अधिकारी अशोक शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मंडळ निरीक्षक तोडसाम, तलाठी दडमल व  खरकाटे  यांनी केले आहे.

error: Content is protected !!