राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा
नागभीड : माय माता आणि मातृभाषा यांचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे” असे सागून “कुसुमाग्रज हे साहित्यातून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विचाराना चालना देणारे श्रेष्ठ साहत्यिक होते असे प्रतिपादन पराग भानारकर यांनी केले.
. ते राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग याच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात बोलत होते.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ जी डी देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे मार्गदर्शक म्हणून साहित्यिक व पत्रकार पराग भानारकर होते आणि विचारमंचावर अंतर्गत गुणवला निर्धारण समितीचे सन्वयक प्रा.डॉ. विकास मोहतुरे व प्रा.प्रमोद डबले याची विशेष उपस्थिती लाभली.
. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ जी. डी. देशमुख यानी ‘आपल्या मराठी भाषेला जितका मोठा समृदध वारस्याचे वैभव आहे तितकीच मोठी आणि थोर साहित्य परपरा आहे तिचे जतन केले पाहिजे. असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र सचालन प्रा. कुसुम चौधरी यानी केले तर आभार प्रा. प्रमोद डबले यानी मानले कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजेंद्र चव्हाण, प्रा. निलेश गोडे, डॉ.अतुल नागपुरे,डॉ.मनीष मते, प्रा.चक्रधर भुर्रे, डॉ.अंकुश कायरकर, प्रा.प्रेमकुमार, खोब्रागडे, प्रा.श्रीकात वनमाळी प्रा.किशोर बोरकर, प्रा.नीरा सिंग तसेच शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


