Home सामाजिक पहिल्या मजल्यावर असलेले डाकघर खाली आणा

पहिल्या मजल्यावर असलेले डाकघर खाली आणा

1115

नागरिकांची मागणी

वृद्धाना नाहक त्रास

नेरी : येथे डाकघर कार्यालय असून सदर कार्यालय हे बाजार चौकात बोलधने ज्वेलर्स च्या वरती पहिल्या मजल्यावर आहे. सदर कार्यालयात कामकाजासाठी जाताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जेष्ठ नागरिक तसेच विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. नियमित जाणारे लोकांना पायऱ्या चढून जाताना दमछाक होत असते त्यामुळे सदर कार्यालय हे खाली आणावे यासाठी प्रशासनाकडे अनेकदा मागणी केली. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांनी मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

.      नेरी हे मोठी बाजरपेठ असलेले व ग्रामीण क्षेत्राशी जोडलेले मोठे गाव आहे. या गावात एक डाकघर कार्यालय असून या कार्यालयाचे बँकिंग क्षेत्रात पर्दापण झाल्याने या कार्यालयात हजारो खातेदारांनी खाते काढले आहेत. तसेच असंख्य नागरिक कामकाजानिमित्य कार्यालयात येत असतात मात्र कार्यालय वरच्या मजल्यावर असल्याने पायऱ्या चढून जाण्यासाठी नागरिकांची दमछाक होत आहे. तसेच मोदी शासनाने अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे हजारो लोकांचे निधी डाक कार्यालयात सरळ त्यांच्या खात्यात जमा होत असल्याने व्यवहार करण्यासाठी कार्यालयात जावे लागते तसेच लाडक्या बहिणीचे पैसे काढण्यासाठी जावे लागते वयोवृद्ध नागरिकांना मानधन उचलण्यासाठी कार्यालयात जावे लागते आणि दैनंदिन व्यवहार करावा लागतो तसेच विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कार्यालयात वरच्या मजल्यावर चढताना व उतरताना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे तेव्हा तात्काळ या गंभीर बाबीची प्रशासनाने दखल घेऊन डाकघर कार्यालय खाली म्हणजे खालच्या मजल्यावर आणावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.

error: Content is protected !!