Home सामाजिक भद्रावतीत श्री संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा

भद्रावतीत श्री संत गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात साजरा

1106

भद्रावती : शहरातील श्री गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराज प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमीत्याने मंदिर परीसरात दिनांक १३ ते २० फेब्रुवारी दरम्यान विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

.       यादरम्यान मंदिरात शिवमहापुराण करा ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय सामुदायीक ध्यान,ग्रामसफाई, भजन,किर्तन ,विवीध स्पर्धा तथा अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक २० ला सकाळी ७ वाजता मंदिरातून श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सदर शोभायात्रा मंदिरातून निघुन शहरातील मुख्य रस्ता, जुने पोलीस स्टेशन, मुख्य बाजार अशी होत परत मंदिरात पोहोचल्यानंतर तिची सांगता करण्यात आली. या शोभायात्रेत शहरातील पुरुष तथा महिला भावीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी गोपालकाल्याच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर सायंकिळी महाप्रसादाचे वितरण करुन सदर महोत्सवाची सांगता करण्यात आली. महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी महोत्सव समितीचे पदाधिकारी, सदस्य तथा नागरीकांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!