दोन दिवसीय महर्षि वाल्मिकी घटस्थापना दिन सोहळा संपन्न
नेरी : चिमूर तालुक्यातील काजलसर येथे महर्षि वाल्मिकी ढिवर समाज काजळसर व अडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री महर्षी वाल्मिकी ऋषी घटस्थापना दिन दि. 17 व 18 फेब्रुवारी ला विकास मच्छिमार सोसायटीच्या प्रांगणात अनेक विविध कार्यक्रमांच्या आयोजनात साजरा करण्यात आला या निमित्ताने महर्षी वाल्मिकी यांची पालखी मिरवणूक भजन दिंडीच्या गजरात काढण्यात येऊन संपुर्ण काजळसर नगरीतून फिरवत महर्षी वाल्मिकी च्या जयघोषाने संपुर्ण परिसर दणाणून उठला.
. काजळसर येथे दि. 17 फेब्रु ला सकाळी परिसर स्वच्छ करून 8 वाजता मुखरू मारबते महाराज हभप मगरे महाराज गोरवठ यांच्या हस्ते घटस्थापना करून कार्यक्रमाला सुरवात झाली. दुपारी 12 वाजता महिलांचे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच दुपारी महिलांची रांगोळीस्पर्धा घेण्यात आली. यात शेकडो महिलांनी भाग घेतलाअनेक बक्षिसे यात आकर्षक रांगोळीला देण्यात आले. रात्रोला भजन संध्या आयोजित केली होती. यात अनेक भजन मंडळांनी भाग घेतला. यात मोटेगाव बोथली अडेगाव काजळसर उनळा मेंढा आदी सह अनेक महिला पुरुषांच्या भजन मंडळांनी भाग घेतला होता.
. दि. 18 ला सकाळी परिसर स्वच्छ करून प्रत्येक घरासमोर रांगोळी काढून श्री. महर्षी वाल्मिकी ऋषींच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक काढण्यात आली यात ‘डोल ताशा व भजन दिंडी च्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात पुरुष आणि महिलांनी एकाच रंगाचे वस्त्र परिधान केले होते. तसेच विद्यार्थी सुद्धा सहभागी होऊन मिरवणुकीचे आकर्षण बनले होते. यात भजन मंडळांनी सुद्धा सहभाग घेतला होता. महर्षी वाल्मिकीच्या जयघोषाने संपुर्ण परिसर दणाणून सुटला होता. वाजत गाजत मिरवणूक संपूर्ण नगरीतून फिरून सोसायटीच्या प्रगणात या मिरवणुकीची सांगता झाली. यानंतर मान्यवरांच्या मार्गदर्शनचा कार्यक्रम घेण्यात आला.
. यात उदघाटक मार्गदर्शक म्हणून उज्वला सुधाकर पोईनकर किटाळी आशिष ननावरे सरपंच काजळसर तर अध्यक्ष सदाशिव मेश्राम प्राचार्य खडसंगी निमाक्षी संजय मेश्राम नगरसेविका सिंदेवाही प्रमुख मार्गदर्शक भाग्यवान मेश्राम गडचिरोली कोमल अजबरव मेश्राम गिरगाव विश्वास सामुसाकडे अध्यक्ष मच्छिमार सोसायटी हिरामण गेडाम उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम सचिव तर वाल्मिक समितीचे श्रीकृष्ण सामुसाकडे अध्यक्ष काशीनाथ ठाकरे उपाध्यक्ष संजय नागपुरे सचिव आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शनात मान्यवरांनी सामाजिक समस्या समाजाची आर्थिक स्थिती शैक्षणिक समस्या सामाजिक एकता आणि समाजाची प्रगती कशी होईल.


