मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य द्वारा निर्धारित १०० दिवस उपक्रम
नागभीड : मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य द्वारा निर्धारित १०० दिवस अंतर्गत ७ कलमी कार्यक्रम अनुषंगाने तहसील कार्यालय नागभीड व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार प्रताप वाघमारे यांचे मार्गदर्शनात मौजा नवेगाव हुंडेश्वरी येथे समस्या अवलोकन निराकरण शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
. प्रास्ताविक मंडळ अधिकारी सुभाष बोड्डावार यांनी केले व विविध विभागातील योजना समजाऊन घेऊन अमलात आणण्याबाबत सुचविले. महसूल विभाग, कृषी विभाग, वनविभाग, इलेक्ट्रिकल विभाग, आरोग्य विभाग, एकात्मिक बाल विकास विभाग व उपस्थित इतर विभागातील कर्मचारी यांनी शासकीय योजना समजाऊन सांगितले. जनतेचे समस्याचे निराकरण करण्यात आले.
. शासकीय योजना बद्दल मार्गदर्शन करण्यात आले. ॲग्रीस्टॉक नोंदणी व प्रमाणपत्र, ७/१२ नमुना ८ दाखले, वृक्षारोपण उपस्थीत कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार कावळे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमा प्रसंगी नायब तहसीलदार कावळे, आरोग्य विभाग, कृषी विभाग, महावितरणचे ढूमणे, बा.वि.प्र. अधिकारी शिला गेडाम, मंडळ अधिकारी बोड्डावार, तलाठी अतकरे, सरपंच नेवारे, ग्रामसेवक मूळनकर, ग्रा.पं.सदस्य, ग्रा.पं.कर्मचारी व ऑपरेटर, वनविभागाचे तावडे, पो.पा. चौधरी व इतर विभाग कर्मचारी आणि सन्माननीय ग्रामस्थ उपस्थित होते.


