Home सामाजिक वासेरा येथे ‘सौर ऊर्जा पंपाचे’ भूमिपूजन

वासेरा येथे ‘सौर ऊर्जा पंपाचे’ भूमिपूजन

1139

सिंदेवाही : वासेरा ग्राम पंचायत अंतर्गत गावात अनेक हातपंप आहेत. त्या हात पंपावर सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावून पाणी उपसा करण्याचे काम ग्राम पंचायत मार्फत करण्यात येणार असून नुकतेच सौर ऊर्जा पंपाचे भूमिपूजन सरपंच दिलीप मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले.

.    पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत ग्राम पंचायत वासेरा येथील लोकसंख्येचा विचार करता, सध्या वापरात येणाऱ्या पाण्यासाठी नळयोजना सोबतच गावात असणारे हात पंप यांचा वापर करण्यात येते. सध्या हातपांपावरील पाण्याची पातळी खोलवर गेली असल्याने पाणी उपसा करण्यासाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ग्राम पंचायत कार्यालय मार्फत १५ वा वित्त आयोग अंतर्गत गावातील वॉर्ड क्रमांक २ मधील सोना मेश्राम यांचे घराजवळील हात पंपावर, वार्ड क्रमांक ३ मधील देवाजी बोळेवार यांचे घराजवळील हात पंपावर, तसेच वार्ड क्रमांक ४ मधील तेजराम झोडे यांचे घराजवळील हात पंपावर, सौर ऊर्जेवर चालणारे पंप लावून पाणी उपसा करण्याचे काम करण्यात येणार असून सोमवारी सदर कामाचे भूमिपूजन सुद्धा करण्यात आले आहे.

.    यावेळी ग्राम पंचायत सरपंच दिलीप मेश्राम, उपसरपंच महेश बोरकर, सदस्य अस्मिता रामटेके, प्रीती कारमेंगे, सुरेखा चिमलवार, मंदा मुनघाटे, महेंद्र सूर्यवंशी, नागेश बंडीवार, ग्राम पंचायत अधिकारी हरीहर गुरनुले, यांचे सह वार्डातील नागरिक उपस्थित होते. प्रत्येक वार्डातील हात पंपावर सौर ऊर्जेवर चालणारे पंप बसवून पाण्याचा उपसा करीत असल्याने वार्डातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

error: Content is protected !!