रोटरी क्लबचा रोटरी सप्ताह
भद्रावती : भद्रावती रोटरी क्लब तर्फे 16 ते 23 फेब्रुवारी या दरम्यान रोटरी सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत रोटरी क्लबतर्फे तालुक्यात विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आहे.
. या सप्ताहाचे औचित्य साधून रोटरी क्लबतर्फे शहरातील फेरीलँड स्कूल अँड कॉलेज येथे विद्यार्थिनीकरिता सुरक्षित व असुरक्षित स्पर्श याबद्दल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, रोटरीचे अध्यक्ष किशोर खंडाळकर, सुनील पोटदुखे, विक्रांत बिसेन, सुनिता खंडाळकर, प्राचार्या वर्षा धानोरकर, डा. माला प्रेमचंद, कीर्ती गोहणे, रश्मी बिसेन, रुकसाना शेख, स्वाती चारी, तृप्ती हिरादेवे, कविता सुपे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमातून मार्गदर्शकांनी विद्यार्थिनींना सुरक्षित व असुरक्षित स्पर्श, मासिक पाळी, स्त्रियांचे मानसिक स्वास्थ्य व स्त्रियांच्या अन्य समस्यांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळा तथा महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षकवृंद, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


