कुचना : मध्य रेल्वेचे मुंबई महाव्यवस्थापक धर्मवीर मीणा शुक्रवारी चंद्रपुर दौऱ्यावर असताना माजरी रेल्वे स्थानकावर माजरी चे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी भेट घेत विविध मागण्याचे निवेदन दिले.
. माजरी येथील रेल्वे स्टेशन परिसरातील भद्रावती – वणी मुख्यरस्त्यवरील रेल्वे परिसरात रेल्वे महाव्यवस्थापकांचा आढावा दौरा दिनांक 14 फेब्रुवारी शुक्रवार ला पूर्वनियोजित होता. माजरी येथील भेटीदरम्यान त्यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यात माजरी रेल्वे स्थानकातील कोरेना काळात बंद झालेल्या अनेक ट्रेनचे थांबे पुर्ववत सुरू करण्यासाठी तसेच माजरी गेट नंबर 32 A, 32 B प्रवाशी नागरिकांसाठी गाड्या तासनतास बंद असते त्यामुळे माजरी येथील स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना, तसेच रुग्णांना तालुका, किंवा जिल्हा, स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसतो. या सर्व गंभीर बाबीचा आढावा डॉ. अंकुश आगलावे तसेच गावातील नागरिकांनी लेखी स्वरूपात निवेदन देत समस्यांचे निराकरण करण्यासाठी मागणी केली.
. यावेळी मागणी सरपंच छाया जंगम, डॉ.अंकुश आगलावे, एम.पी.राव, राकेश दोंतावर, सुधीर उपाध्ये, विजय पोतदार इत्यादी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये माजरी येथील सर्व पत्रकार च्या वतीने रेल्वे जी. एम. धर्मवीर मीना यांना निवेदन देण्यात आले.


