नेरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अश्विन आगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग सप्ताह दिनानिमित्त कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम कार्यक्रम राबविण्यात आला.
. यात 30 वर्षावरील सर्व रुग्णांना प्रामुख्याने आढळणाऱ्या मुख कर्करोग तपासनी दंत शल्य चिकित्सक डॉ.राजेश शेंडे यांनी 62 रुग्णांची तपासणी केली एक रुग्ण मुख कर्करोग संशयित रुग्ण असल्याचे आढळून आले. तसेच महिलांचे स्तन कर्करोग व गर्भाशयाचा कर्करोग तपासणी डॉ. अश्विनी पिसे यांनी केली याकरिता इतर कर्मचारी सुषमा लोनबळे अधिपरिचारिका शरिक शेख, भक्ती वेरुळकर, प्रीती बोदलकर (अ.प) यांचे सहकार्य लाभले.
. सदर कार्यक्रम डॉ. महेश मंगर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नेरी, डॉ. वैष्णवी कामडी वैद्यकीय अधिकारी नेरी डॉ. मनोज तेलमासरे वैद्यकीय अधिकारी पत्तीवार, अजानी एल एच व्ही मडावी, एच. ए. हेमके, पारशिवे ए .एन. एम. यांनी सुव्यवस्थापन करून मोलाचे सहकार्य केले.


