Home सामाजिक सारंगड येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 56 वी पुंण्यतिथी उत्साहात

सारंगड येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 56 वी पुंण्यतिथी उत्साहात

1138

श्री गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करून महाराजांची पुण्यतिथी केली साजरी

नेरी : चिमुर तालुक्यातील सारंगड येथे नव्यानेच गुरुदेव सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली असून गुरुदेव सेवा मंडळ व संपूर्ण ग्रामवाशीयांच्या वतीने मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची दोन दिवसीय 56 वा पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या उत्साहात पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला

.     सारंगड येथे दि 9 फेब्रु ला पुण्यतिथी महोत्सवाला सुरवात झाली ग्रामसाफई सामुदायिक ध्यान करून घटस्थापणा हभप मगरे महाराज व हभप एकनाथ बोरकर यांच्या हस्ते करणयात आली यानंतर कार्यक्रमाला सुरवात होऊन महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मान्यवर म्हणून सुमित्रा चौखे, सुलोचना दडमल, लता गजभे, प्रभा दडमल, जयमाला चौधरी, वच्छला चौधरी, राणी ननावरे, जोसना दडमल, रंजना गजभे, भारती जांभूळे उपस्थित होत्या तथा गावातील संपूर्ण महिला मंडळींनी भाग घेतला होता यानंतर महिला भजन सध्या आयोजित करण्यात आली यात वैष्णवी भजन मंडळ आणि मंजुळा माता भजन मंडळ यांनी भाग घेतला सायंकाळी सामुदायिक प्रार्थना शंकर सोनवाने गुरुजी खुंटाळा यांनी मार्गदर्शन केले लगेच जागृती भजनाचे आयोजन करण्यात येत होते यात खुंटाला सिरपुर लावारी बोथली नवतला सोनापूर लोहारा खुंटाळा आदी सह 11 भजन मंडळांनी भाग घेतला होता.

.     दि 10 फेब्रु ला ग्रामसफाई करून सामुदायिक प्रार्थना व ध्यानावर हभप गोविंदा मेश्राम यांनी मार्गदर्शन केले यानंतर लगेच हभप एकनाथ बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली रामधून वाजत गाजत महाराज्यांच्या पालखी सह गावातून मुख्य मार्गाने काढण्यात आली या पालखी मिरवणुकीला गावातील महिला पुरुषांनी बालगोपालांनी भाग घेतला होता ढोल तश्या आणि टाळ मुदनगाच्या निनादात व राष्ट्रसंताच्या जयघोषात मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली यावेळी सोनापूर व सारंगड येथील भजन मंडळांनी पालखी मिरवणुकीत सहभाग नोंदविला होता यानंतर रामधून वर आनंदराव श्रीरामे यांनी मार्गदर्शन केले.

.      यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला हभप सुखदेव धारने महाराज यांच्या सुरेख वाणीतून कीर्तन पार पडले गोपाळकाळा सुखदेव धारने महाराजांच्या उपस्थितीत संपन्न झाला लगेच पाहूंण्याचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले यावेळी ग्रामगीताचार्य प्रा. राम राऊत, विलास पिसे, धनराज गुरनुले, संजय दडमल, नरेंद्र लोथे, शंकर भरडे, राजू ननावरे, चदु दडमल, सिद्धार्थ नागोसे, नीलकंठ धाडसे मान्यवर म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी एकनाथ बोरकर राजू ननावरे बाळकृष्ण गायकवाड दीपक तुरारे आदि सह गुरुदेव सेवा मंडळ व गावकऱ्यांनी सहकार्य केले. मौन श्रद्धांजली अर्पण करून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!