Home सामाजिक विसापूर ग्रामपंचायतीला संत रविदासांची प्रतिमा भेट

विसापूर ग्रामपंचायतीला संत रविदासांची प्रतिमा भेट

1107

बल्लारपूर : श्री. संत रविदास महाराज यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखेच्या वतीने श्री. संत रविदास महाराज यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी ग्रामपंचायत सभागृहात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला मालार्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले.

.     राज्य शासनाने श्री. संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयात साजरी करण्याचा आदेश नुकताच निर्गमित केला. त्यानुसार येथील ग्रामपंचायत मध्ये श्री. संत रविदास महाराज यांची जयंती उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, प्रा. डॉ. श्यामकुमार डहाळे, विजय टोंगे, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे अध्यक्ष डॉ. सुनिल बुटले, उपाध्यक्ष सुरेश पंदीलवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भटवलकर, पदाधिकारी शामराव लिपटे, शिवकुमार बांगडे,रविंद्र वाढई,विठ्ठल दुबे यांची उपस्थिती होती.

.     यावेळी रामभाऊ टोंगे म्हणाले,‘मन चंगा तो कटोती में गंगा’ हा संत रविदास महाराज यांचा मंत्र आपणास प्रेरणा देणारा आहे. या विचारावर प्रत्येकांनी वाटचाल करावी. कर्म व मन स्वच्छ ठेवावे. हिच संत रविदास महाराज यांची खरी शिकवण आहे, असे त्यांनी मनोगत व्यक्त करुन संत रविदास महाराज यांना अभिवादन केले. संचालन सुभाष भटवलकर यांनी केले. आभार प्रदर्शन लिपीक संतोष निपुंगे यांनी केले.

error: Content is protected !!