विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
भद्रावती : येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवार दिनांक 12 ते 13 फेब्रुवारीला संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती समारोहाचे आयोजन स्थानिक दरबार सोसायटी येथील संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिरात करण्यात आले असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
. दि. 12 ला सकाळी दहा वाजता घटस्थापना ,दुपारी महिला मंडळाचे भजन ,रांगोळी स्पर्धा व सायंकाळी सहा वाजता पासून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 13 ला सकाळी दहा वाजता आरती, मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार करण देवतळे यांच्या हस्ते तर वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते वसंत लिपटे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष विप्लव लांडगे, संपर्कप्रमुख सुभाष भटवलकर, तालुका अध्यक्ष वरोरा शंकर वरटकर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार असून मार्गदर्शक म्हणून विदर्भ अध्यक्ष संभा वाघमारे मार्गदर्शन करणार आहे .महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संत शिरोमणी गुरु रविदास महाराज जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत मुडे, मनोज नदरे, अतुल खंडळे, महादेव कोल्हे, प्रकाश मेंढे आदींनी केले आहे.


