Home सामाजिक उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे अत्याधुनिक रुग्णवाहिका व एक्सरे मशिनचे लोकार्पण

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे अत्याधुनिक रुग्णवाहिका व एक्सरे मशिनचे लोकार्पण

1131

वरोरा : उपजिल्हा रुगणालय वरोरा येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असणारे एएलएस रुग्णवाहिकेचे तसेच पोर्टेबल एक्सरे मशिन चे लोकार्पन करण्यात आले, राज्यस्तरीय लोकार्पण सोहळा ठाणे येथे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे व सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचे हस्ते पार पडला ज्यामधे उपजिल्हा रुग्णालय वरोरा चे वतिने दुरद्रुष्य प्रणाली द्वारे सहभाग नोंदवला.

.     राज्यस्तरावर ८ कर्करोग मोबाईल वाहन, ७ अत्याधुनिक रुग्णवाहिका, ६ डे केयर केमोथेरेपी सेंटर, २ सि. टी स्कॅन व ८० डिजिटल एक्सरे मशिनचे लोकार्पण करण्यात आले, त्यापैकी १ अत्याधुनिक रुग्णवाहिका वरोरा महामार्ग एनएच 353 ई करिता व एक्सरे मशिन वरोरा उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे उपलब्ध करुन देण्यात आली, सदर लोकार्पण सोहळा रुग्ण कल्याण समिती सदस्य खासदार प्रतिनिधी सुभाष दांदडे यांचे अध्यक्षतेत व आमदार प्रतिनीधी बाळु भोयर यांचे हस्ते पार पडला.

.        यावेळी व्यासपीठावर प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कन्हेरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचन्द कन्नाके, वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रफुल खुजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ कन्नाके यांनी केले. यावेळी त्यानी शासनाचे विविध आरोग्य योजना व उपजिल्हा रुग्णालया वरोरा येथे उपलब्ध सोइसुविधा व नविन रुग्णालय इमारतीचे आवश्यकते बाबत मत व्यक्त केले. उद्घाटनपर बोलताना बाळु भोयर यांनी रुग्णालय कामकाजा बाबत समाधान व्यक्त करताना, रुग्नसेवा हिच ईश्वर सेवा समजुन रुग्नाना दर्जेदार सेवा देन्याचे आव्हान सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचार्‍यांना केले, आभार वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रफुल खुजे यांनी मानले तर सुत्रसंचालन गोविंद कुम्भारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करनेकरिता ओन्कार मडावी, बन्डु पेटकर, सुमित ठेंगणे, अमोल भोन्ग, दिपक खडसाने, नकले, कोडापे, मीना मोगरे यांनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!