Home सामाजिक चंद्रपूर शहरात विविध उपक्रम राबवित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा

चंद्रपूर शहरात विविध उपक्रम राबवित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा

1135

50 दात्यांनी केले रक्तदान

चंद्रपूर : पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव,विधानपरिषद आमदार,डॉ मनिषा कायंदे,जिल्हा संपर्कप्रमुख किशोर राय यांच्या आदेशाने, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या उपस्थितीत,महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकूर, महानगर प्रमुख भरत गुप्ता,यांच्या नेतृत्वात चंद्रपूर शहरामध्ये दि. 9 फेब्रुवारी रविवारला उपमुख्यमंत्री .एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला.वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

.      कार्यक्रमाची सुरवात सकाळी एकनाथ शिंदे यांच्या नावाने माता महाकाली मंदिरात होम हवन करून, त्यांना आई माताकाली उदंड आयुष्य देवो अशी प्रार्थना करण्यात आली.त्यानंतर विठ्ठल ‌मंदिर प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला, तर तुकुम प्रभागात दोन रुग्णवाहिकांचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर महाकाली कॉलरी प्रभागात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, त्यात २२० रुग्णांनी या आरोग्य शिबीराचा लाभ घेतला. आणि महाकाली कॉलरी प्रभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. अश्या विविध प्रकारच्या उपक्रमांनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस मोठया उत्साहात चंद्रपूर शहर आणि विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

.     या विविध कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता शिवसेना महिला जिल्हा प्रमुख प्रतिमा ठाकुर, महानगर प्रमुख भरत गुप्ता, महिलासेना शहर प्रमुख वाणी सदालावर, उपजिलाप्रमुख माया मेश्राम, माजीनगरसेविका सीमा रामेडवार, अंजु लेंगुरे, सुषमा राय, ज्योती जंगम, माधुरी रासेकर, उपशहरप्रमुख मोनिद येरेवार, सूचक दखणे, शैलेश सदालावार, जफर शेख, राजू ऐटलवार, नयन जंगम, तेजस गाणार, आदित्य यादव व शिवसैनिकांची उपस्थिति होती.

error: Content is protected !!