भद्रावती : शिवसेना शिंदे गटातर्फे पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रम राबवित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
. या कार्यक्रमाचे औचित साधून जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर यांच्या हस्ते शहरातील नाग मंदिर परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करून परिसरातील कामगारांना टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. यावेळी भद्रावती शिवसेना शिंदे गटातर्फे एकनाथ शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सदर कार्यक्रमाला पक्षाचे जिल्हा संघटक अड. युवराज धानोरकर, विधानसभा संघटक नरेश काळे, युवा सेनेचे जिल्हा समन्वयक प्रमोद नागोसे, विधानसभा संघटक मुनेश्वर बदखल, विकास डुकरे, संदीप कुंमरे, आकाश ढवस, स्वप्नील ढेंगळे, मंगेश ईखारे, नितीन चंदनखेडे, मनीष बुच्चे आदी उपस्थित होते.


