ग्रामपंचायत कडून निलिमाचा सत्कार
वर्धा येथे कृषी अधिकारी म्हणून निवड
नेरी : नुकतीच एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन वर्धा येथे कृषी अधिकारी म्हणून निवड झालेली चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील नीलिमा नामदेव बोरकर हिने गावाचे नाव लौकिक केले त्याबद्दल ग्रामपंचायत सावरगाव च्या वतीने निलिमाचा सत्कार समारंभ आयोजित करून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन तिचा दि 8 फेब्रुवारी ला सत्कार केला आणि अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
. या सत्कार समारंभाला मार्गदर्शन करताना निलिमाने सांगितले की एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करणे खूप कठीण आहे मात्र कठोर मेहनत जिद्द चिकाटी परिश्रम यांच्या बळावर नक्कीच यश प्राप्त करता येते.गावातील प्रत्येक तरुण तरुणीने स्पर्धा परीक्षेची तयारी करून आपल्या जीवनाचे आपणच शिल्पकार व्हावे आणि गावाचे नावलौकिक करावे असे सांगून तिने स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी केलेली धडपळ प्रयत्न मेहनत आणि आलेले अनुभव कथन केले या युगात स्पर्धेशिवाय दुसरे काहीच नाही स्पर्धेत टिकले तर जीवनात यश नक्कीच मिळणार असा मंत्र दिला तसेच गावातील युवकांना युवतींना स्पर्धा परीक्षेत भाग घेण्याचे सांगून मदत करण्याचे सांगितले आहे.
. या सत्कार समारंभाला सावरगाव ग्रामपंचायत च्या सरपंच शीतल धारने, अजय पराते उपसरपंच, एस जी उराडे, देवानंद पा गावंडे तमुस अध्यक्ष, भाग्यश्री कोरांगे सीआरपी, मंगला धकाते अंगणवाडी सेविका, नामदेव बोरकर, सूरज श्रीरामे, देवानंद कुंभरे, ग्रा प कर्मचारी उपस्थित होते.
. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करून निलीमाचे प्राथमिक शिक्षक तसेच तिच्या अडीअडचणी यावर मार्गदर्शन केले यावेळी गावातील युवक युवती महिला पुरुष गावकरी उपस्थित होते.


