Home सामाजिक मोफत नेत्र शस्त्रक्रियेसाठी रूग्ण सावंगी येथे रवाना

मोफत नेत्र शस्त्रक्रियेसाठी रूग्ण सावंगी येथे रवाना

1114

वरोरा : हेल्थएज इंडिया व दत्ता मेघे मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिटय़ूट सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे नागरी येथे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिरातील रूग्णांना मोफत शस्त्रक्रिया साठी सावंगी येथे पाठविण्यात आले.

.      सदर शिबीर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख रविन्द्र शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख रोहण कुटेमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा प्रमुख युवासेना अभिजित कुडे यांच्या सौजन्याने करण्यात आले होते.  दत्ता मेघे मेडिकल व रिसर्च इन्स्टिटय़ूट कॉरडीनेटर चे मुरलीधर उमाटे, सामाजिक कार्यकर्ते अमोल हेल्थएज इंडिया सीनियर एक्झिक्युटीव्ह रशेदा शेख यांचे सहकार्य लाभले. नागरी व आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.  जेष्ठ नागरिकांना शस्त्रक्रिया साठी सावंगी येथे रवाना करण्यात आले त्यांच्या चेहर्‍यावर चा आनंद यातच समाधान आहे यावेळी रोशन भोयर, विजय कुडे उपस्थित होते.

error: Content is protected !!