Home सामाजिक भद्रावतीत आज पासून खुले कबड्डी सामने

भद्रावतीत आज पासून खुले कबड्डी सामने

1128

भद्रावती : स्व. वसंतराव सातपुते व स्व. रितेश सातपुते यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गितेश वसंतराव सातपुते यांच्या सौजन्याने न्यू साई राजे क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळातर्फे पुरुष व महिलांचे खुले कबड्डी सामने स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूल येथे ७ ते ९ फेब्रुवारीदरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

.      ही स्पर्धा तीन गटांत घेण्यात येणार आहे. ‘अ’ गटातील प्रथम विजेत्यास ४१ हजार रुपये, उपविजेत्यास ३१ हजार रुपये, तृतीय विजेत्यास २१ हजार रुपये, ब’ गटातील प्रथम विजेत्यास ३० हजार रुपये, उपविजेत्यास २० हजार रुपये आणि तृतीय विजेत्यास १० हजार रुपये, क गटातील प्रथम विजेत्यास ११ हजार रुपये उपविजेत्यास सात हजार रुपये आणि तृतीय विजेत्यास ५ हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

.      उद्घाटन सोहळ्याला ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार करण देवतळे, आमदार संजय देरकर, तहसीलदार राजेश भांडारकर, ठाणेदार अमोल काचोरे, मुख्याधिकारी विशाखा शेळकी, जिल्हा क्रीडा अधिकारी जयश्री देरकर, गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, नितीन भटारकर, नितीन मत्ते, मुकेश जीवतोडे, जिल्हा परिषद हायस्कूलच्या मुख्याध्यापिका भारती गावंडे, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, डॉ. चेतन कुटेमाटे यांची उपस्थिती राहणार आहे. तर बक्षीस वितरण कार्यक्रमाला अहतेशाम अली, मीनल आत्राम, मुनाज शेख, अॅड. सुनील नामोजवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, डॉ. वैभव शिंदे, रमेश मेश्राम, जितेश कुळमेथे, अॅड. भूपेंद्र रायपुरे, वासुदेव ठाकरे, सतीश वरखडे, सूरज ठाकरे, नंदोरीचे सरपंच मंगेश भोयर, हेमंत आवारी, पोटे, भूषण बोढाले, किसन पत्तीवर, सचिन सरपटवार यांची उपस्थिती राहील.

error: Content is protected !!