Home सामाजिक सातशे विद्यार्थ्यांच्या सामूहिक सूर्यनमस्कार

सातशे विद्यार्थ्यांच्या सामूहिक सूर्यनमस्कार

1133

सप्तमीच्या निमित्ताने सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन

वरोरा : माणसाच्या सुदृढ शरीरासाठी सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार म्हणजे नमस्कार आहेत. विविध आसनांचा तो संगम आहे. ही आसने करताना त्याला वयाचे बंधन नाही आणि म्हणून विद्यार्थ्यांनी शरीर सुदृढतेसाठी योग साधना करावी. त्यामुळे त्यांचे मनोबल, एकाग्रता आणि शारीरिक शक्ती वाढीस लागते असे प्रतिपादन हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य महेश डोंगरे यांनी केले. लोकशिक्षण संस्था, वरोरा अंतर्गत योग भारती द्वारा रथसप्तमी चे औचित्य साधून सामूहिक सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन गुरुवारला लोकमान्य महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते
यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. सर्वप्रथम संस्थेचे उपाध्यक्ष दिवंगत श्रीकृष्ण घड्याळपाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

.      याप्रसंगी बोलताना प्रा. श्रीकांत पाटील यांनी सूर्यनमस्कार म्हणजे शरीरावर केलेला संस्कार आहे असे सांगत आजचे युग शरीर जागृततेचे असल्याचे ते म्हणाले. आता लोकांमध्ये शरीर स्वास्थ्य संबंधी जागरूकता वाढली असून लोक व्यायाम आणि नियमित आसने करतात. त्यामुळे आरोग्य प्रदीर्घकाळ उत्तम राहते. याची सुरुवात बालवयात व्हावी म्हणून या सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन असल्याचे ते म्हणाले.

.    याप्रसंगी लोकशिक्षण संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयाच्या तब्बल 700 विद्यार्थ्यांनी समंत्र सामूहिक सूर्यनमस्कार श्री लक्ष्मी यंत्राच्या प्रतिकृतीमध्ये घातले. तर महिलांनी सादर केलेले खुर्चीवरील आसणे वेधक होते. विद्यार्थ्यांचे संस्कृत उच्चार शुद्ध व्हावेत म्हणून राम रक्षा स्तोत्र, सूर्याष्टकम सादर केले. संस्थेतील राज्य स्तर आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध खेळाडूंचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. संचालन अनन्या गायकवाड व मेघना वरपटकर यांनी केले. प्रास्ताविक समीक्षा उपरे तर आभार फलकनाज शेख यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता महिषासुरमर्दिनी स्तोत्राने करण्यात आली. योग साधकांची मोठी उपस्थिती कार्यक्रमाला होती.

error: Content is protected !!