Home सामाजिक धनगर समाजाला यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा 

धनगर समाजाला यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा

1105

आमदार करण देवतळे यांना निवेदन

भद्रावती : वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातील धनगर समाजाला यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र धनगर समाज महासंघ चंद्रपूर यांच्या वतीने आमदार करण देवतळे यांना महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रमेश बुच्चे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.

.     यावेळी आमदार करण देवतळे यांनी घरकुलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या निवेदनाच्या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये पत्रकार पुंडलिक येवले, समाजसेवक लिमेश माणूसमारे, माजी मल्हार सेना तालुका अध्यक्ष संदीप मंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उत्सव समिती आयोजक गणेश चिडे, शिवसेना उपशहर प्रमुख मनिष बुच्चे, सामाजिक कार्यकर्ते सुरज ढवळे आदींचा समावेश होता. या निवेदनाद्वारे धनगर समाजाच्या घरकुल योजनेच्या अडचणी लवकरात लवकर दूर करून लाभार्थ्यांना घरे मिळावीत, अशी मागणी करण्यात आली.

error: Content is protected !!