Home सामाजिक गडचांदूर येथे ‘श्रीतेज प्रतिष्ठान’चा थाटात शुभारंभ

गडचांदूर येथे ‘श्रीतेज प्रतिष्ठान’चा थाटात शुभारंभ

1105

गडचांदूर : एका सेवाभावी संस्थेला आवश्यक असलेली दृष्टी आणि सहकार्य ‘श्रीतेज प्रतिष्ठान’कडे असल्यामुळे भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक हिताची मोठमोठी कार्ये नक्कीच पार पाडली जातील यात शंकाच नसल्याचे प्रतिपादन उदघाटक प्रसिद्ध ‘नीड’ संस्थेचे अध्यक्ष सुनील गोवरदीपे यांनी यावेळी केले.

.      गडचांदूर येथे ‘श्रीतेज प्रतिष्ठान’ या सेवाभावी संस्थेचा शुभारंभा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘श्रीतेज प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष निलेश ताजने होते. शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती याप्रसंगी उपस्थित होते.

.     तिरंगा सन्मान रॅलीने या सोहळ्याला प्रारंभ झाला. या रॅलीत शेकडो सदस्य आणि शहरवासियांनी सहभाग घेतला. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेच्या वतीने प्रज्ञा देवघरे, मुख्याध्यापक परतेकी, मुंबई येथील ग्राफिक्स ऍनिमेशन डिझायनर शीतल काकडे, संस्थेची पांचाड, पत्रकार शंकर तडस यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी विविध शाळा व संस्थेच्या वतीने नृत्य व इतर कलात्मक कार्यक्रम सादर केला गेला. त्यात महात्मा गांधी विद्यालय, लाल बहादूर शास्त्री विद्यालय, होली फॅमिली स्कूल, सरस्वती निकेतन, स्व. भाऊराव पाटील चटप आश्रमशाळा, एम जे डान्स अकॅडमी यांच्या चमूचा समावेश होता. संचालन श्रीतेज प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष खरवडे यांनी, तर आभारप्रदर्शन महेंद्र मंदे यांनी केले.

error: Content is protected !!