नागभीड : अखिल कुणबी समाजातील सर्व महिलांनी एकत्र येत समाजाचा विकास साधावा असे आवाहन अखिल कुणबी समाजाच्या वतीने आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात नागभीड पोलीस स्टेशन च्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा फुकट यांनी प्रमुख मार्गदर्शक स्थानावरून बोलताना केले.
. यावेळी मंचावर प्रमुख अतिथि म्हणून अखिल कुणबी समाज संघटनेच्या जयश्री गरफडे, सुषमा रोहनकर यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना फुकट म्हणाल्या की, कुणबी समाजाच्या महिलांना महिला संबंधित घडणारे गुन्हे, व त्यावर असणाऱ्या कलमा याविषयी माहिती दिली, तसेच महिलांना जागृत होण्याची गरज आहे तसेच आज महिला ज्या उच्च पदस्थ ठिकाणी पोहचलो आहोत ते केवळ क्रांतिज्योतो सावित्रीबाई फुले यांच्या मुळे त्यामुळे त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे असे त्यांनी मत व्यक्त केले तसेच पोस्को कायदा काय आहे आपण आपल्या मुलांना आणि मुलींना याविषयी जागृत करावे तसेच पोस्को गुन्हा ज्याच्यावर दाखल झाला त्यावर त्याला काय काय सहन करावं लागतं हे सुद्धा त्यांनी समजावून सांगितलं.. सायबर क्राईम विषयी देखील थोडीफार माहिती त्यांनी त्यात सांगितली मोबाईलचा वापर कमी करून पुस्तकांकडे वळा असं त्यांनी यावेळी सांगितले.
. कार्यक्रमाचे संचालन प्रा, रुपाली पाथोडे, प्रास्ताविक प्रा.उषा राऊत यांनी केले तर आभार भाग्यश्री गोडे यांनी मानले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.उषा ठाकरे, जयश्री गरफडे,प्रियंका कोरे, कुंदा देशमुख, भाग्यश्री गोडे,अल्का बगमारे,वर्षा उमक, अश्विनी आटमांडे,सुनीता डोइजड, वर्षा मिसार, श्रुती वानखेडे यांनी परिश्रम घेतले.


