Home सामाजिक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची खासदार धानोरकर यांची सांत्वन भेट

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची खासदार धानोरकर यांची सांत्वन भेट

1133

 वरोरा : नागपुर-चंद्रपूर महामार्गावर येन्सा (वरोरा) गावाजवळ झालेल्या अपघातामध्ये मृत झालेल्या शेतमजूर स्व.सरिता बुरटकर आणि स्व. रंजना झुणझुनकर यांच्या कुटुंबियांची खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले व आस्थेने चौकशी केली.

.     या दोन्ही कुटुंबाला शक्य त्या सर्व पातळींवर मदत करण्याचे आश्वासन खासदार धानोरकर यांनी देऊन काही आर्थिक मदत दिली. यापूर्वी त्यांनी ऊपजिल्हा रूग्णालयात जाऊन भरती असलेल्या जखमींची विचारपूस करत योग्य ऊपचाराचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले. चंद्रपूर येथे ऊपचार घेत असलेल्या रूग्णांचीही चौकशी केली. मृत्युमुखी पडलेल्या शेतमजूरांचे परीवारास व जखमी रूग्णास शासकीय मदत मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले.

.      यावेळी नायब तहसीलदार मधुकर काळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रफुल्ल खुजे, माजी नगराध्यक्ष विलास टिपले, माजी नगरसेविका मंगला पिंपळकर, खासदार प्रतिनीधी सुभाष दांदडे उपस्थित होते.

error: Content is protected !!