वरोरा : तालुक्यातील आसाळा येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 56 व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गुरुदेव सेवा मंडळ तसेच गावकर्यांच्या पुढाकाराने दरवर्षी आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी या रक्तदान शिबिरात महिलांनी पुढाकार घेत रक्तदान केले.
. या आरोग्य शिबिरामध्ये शेकडो रुग्णांची तपासणी व औषध उपचार करण्यात आले. तसेच गावातील तरुण युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान केले. तर पहिल्यांदाच गावातील महिलांनी रक्तदान शिबिरात सहभागी होत रक्तदान करीत महिला कुठल्याही क्षेत्रात मागे नसल्याचे दाखवून दिले.
. तालुका ग्रामीण रुग्णालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र कोसरसार आणि भटाळा येथील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांनी शिबिरातील रुग्णांची तपासणी केली, तर नागपूर येथील अमन ब्लड बँक यांनी रक्तदान शिबिर साठी सहकार्य केले, तसेच अमन ब्लड बँक यांच्यामार्फत गुरुदेव सेवा मंडळ यांना आयोजित कार्यक्रमाबद्दल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.


