Home सामाजिक प्रेताला गोंजारले, कुशीतही घेतले अन रडलेही !

प्रेताला गोंजारले, कुशीतही घेतले अन रडलेही !

1114

अंत्ययात्रेत पोहोचलेल्या त्या वानराच्या कृतीने सारेच अचंबित

राम भक्त हनुमान ‘तिच्या’ साठी गहिवरले

वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील घटना

मुक्या प्राण्याच्या आपुलकीने साऱ्यांचे डोळे पाणावले

रवी खाडे / किशोर डुकरे

    वरोरा : आपल्या समाजात सख्खा भाऊ, पक्का वैरी, असी म्हण सर्वश्रुत आहे. मात्र मुका प्राणी याला अपवाद ठरला. राम भक्त म्हणून हनुमानाची महती सर्वत्र आहे. त्याच रूपात वानर या प्राण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. त्याच मुक्या प्राण्याने एका महिलेच्या अंत्यविधीला अचानक हजेरी लावली. तिच्या मुख कमलाला आपुलकीने गोंजारले. त्याच्या प्रेमाच्या व आपुलकीच्या कृतीने साऱ्यांचे डोळे पाणावले. राम भक्त हनुमान ‘तिच्या’ साठी गहिलरले. हा प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात प्रत्यक्ष पिंपळगाव येथे घडला.

.     चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शहीद अक्षय निकुरे यांचे पिंपळगाव हे छोटस गाव आहे. या गावात अंत्ययात्रेत सहभागी आप्तेष्टांनी हा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवला. या प्रसंगाची गावात व परिसरात चांगलीच चर्चा केली जात आहे. वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील विजय मारोती धवने यांच्या मातोश्री अनुसया मारोती धवने (75) यांचे मंगळवारी दि. 28 जानेवारीला सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. तिच्या अंत्यविधीला ध्यानीमनी नसताना राम भक्त हनुमान अवतरले. तिरडीवर तिचे प्रेत होते. तिथे एक वानर आले. त्याने अनुसयाचे अंत्य दर्शन घेतले. गहिवरल्या अवस्थेत प्रेताचा मुका घेतला. हा प्रकार अंत्यविधीला आलेल्या आप्तेष्टांनी अनुभवला. विशेष म्हणजे त्याने अंत्यविधीला देखील हजेरी लावली. अंत्यविधी पूर्ण होत पर्यंत तो थांबला आणि अस्थी विसर्जन करण्यासाठी गेलेल्या कुटुंबाच्या वाहणात बसण्यासाठी सुद्धा त्याने प्रयत्न केला. यामुळे अनुसया सोबत त्याचे नाते काय ? याची चर्चा सर्वत्र केली जात आहे.

.      एकीकडे मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्षाच्या बातम्या केल्या जात आहे. मात्र वन्यजीवांची आपुलकी व प्रेमाचा साक्षात्कार देखील अनुभवला जात आहे. त्या राम भक्त हनुमानाने अनुसयाच्या प्रेताला गोंजारले. तिचा चष्मा काढत तिचे मुख कमल कुशीत घेतले.आपलेच आपल्याला अचानक सोडून गेल्याचे दुःख आहे. यासाठी त्याने अश्रू देखील ढाळले. मुक्या प्राण्याने एखाद्या अंत्यविधीला हजेरी लावली. हा प्रसंग पहिल्यांदा घडला. हा योगायोग ठरला. वन्यजीव व मानव यांच्यातील नाते संबंध वाढवणारा ठरला. या प्रसंगाची चर्चा पंचक्रोशीत केली जात आहे.

अस्थी विसर्जनासाठी धावपळ                                                                                                                                                        अनुसया मारोती धवने या महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधनाची माहिती गावभर झाली. कदाचित ही माहिती वानर रूपात आलेल्या रामभक्त हनुमानाला झाली असावी. सकाळ पासून या वानराने धवणे यांच्या घरी हजेरी लावली. कमलाला आपुलकीने गोंजारत तिच्या अंत्य यात्रेत सहभागी होत स्मशानभूमी पर्यंत पोहचला. मंगळवारी अमावश्या असल्याने अस्थी विसर्जन त्याच दिवशी उरकवण्याचा कुटुंबानी व नातेवाईकांनी निर्णय घेतला. ते एका वाहनाने स्मशानभूमीत गेले. त्याच्या अगोदरच वानर तिथे पोहचले होते व स्मशानभूमीत बसले. कमल च्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी अस्ती गोळा केली व ती अस्ती घेऊन वाहणात बसले असताना ते वानर वाहणात बसण्याचा प्रयत्न करीत होते पण कुटुंबियांनी त्याला बसू दिले नाही. आणि तो ढसाढसा रडू लागला. हा सर्व प्रकार अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केला.

error: Content is protected !!