माजरी : जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके शनिवार पासून जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. दरम्यान चंद्रपूर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना अशोक उईके उपस्थित राहण्यासाठी ते दौऱ्यावर आले होते.
. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम आगमनानिमित्त ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान पाटाळा फाट्यावर अशोक उईके यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी ढोल-ताशा व डीजेच्या गजरात, जेसीबीने फुलांची उधळण करत हार घालून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले . दरम्यान अशोक उईके यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते एकवटले होते.
. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्र्याची जबाबदारी पक्षाने दिली. ती आपण यशस्वीरित्या पार पाडणार. माझ्या प्रथम आगमनावर चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांचे प्रेम पाहून भारावून गेलो, असे प्रतिपादन यावेळी पालकमंत्री अशोक उईके यांनी केले.
. यावेळी आमदार करण देवतले, कामगार मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष उमेश बोढेकर, वरोरा विधानसभा प्रमुख रमेश राजूरकर, महिला कामगार जिल्हाअध्यक्ष अमृता सूर, कामगार मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अक्षय सोनटक्के, दक्षिण भारतीय आघाडी जिल्हाअध्यक्ष मनिष रामील्ला, जिल्हा महामंत्री राकेश तालावार, कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष विनोद वाटेकर, वरोरा तालुकाअध्यक्ष सागर कोहळे, सुधीर उपाध्ये, बाबुराम केवट, तोटा शंकर, बुधराज केवट, सदानंदम दासारपू यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते


