नागभीड : कृषक विद्यालय कोटगांव येथे प्रजासत्ताक दिनाच्या औचीत्याने सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सोबतच गुणवंत विदयार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, क्रीडा स्पर्धा, क्रिकेट, प्रश्नमंजुषा, रांगोळी,निबंध स्पर्धा चे आयोजन करण्यात आले होते.
. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टीचर्स करिअर एज्युकेशन सोसायटी कोटगांव चे अध्यक्ष रामकृष्ण उईके होते तर विशेष अतिथी म्हणून संस्था उपाध्यक्ष डी. एस.धोटे, सचिव बी. सी.भेंडारकर, माजी मुख्याध्यापक एम.एन.ओरके, माजी मुख्याध्यापक ए.बी.काटेखाये, सी.डी टेंभुर्णे, ए.जी. समर्थ, पुंडलिक रामटेके कोटगाव चे उपसरपंच यशवंत भेंडारकर, पत्रकार आनंद मेश्राम, ग्रा. पं. सदस्य आनंदराव जांभुळे, संस्था सदस्य श्रावण मोहरकर, विद्यालयाच्या माजी मुख्याध्यापिका सी.जी.मरघडे, सेवानिवृत्त शिक्षिका, व्ही.डी.भागवतकर इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होते.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.पी पिसे यांनी केले, संचालन एम. पी. मंदे, पी. एन. बारसागडे तर आभार एन. एल.ठाकरे यांनी केले.शाळेची विशेष उपलब्धी म्हणजे वर्ग 5 मधील 2 विद्यार्थ्यांची निवड नवोदय करिता झाली, 2 विद्यार्थ्यांची निवड NMMS स्कॉलरशिप करिता, 2 विद्यार्थिनीची निवड छत्रपती राजाराम सारथी स्कॉलरशिप करिता निवड झाली वर्ग 10 मधून सुगीत मोतीलाल जांभुळे या विद्यार्थ्याने शाळेतुन प्रथम येण्याचा, अर्पिता भास्कर घोडमारे हिने द्वितीय येण्याचा, तर श्रद्धा हरिचंद्र रंधये तृतीय येण्याचा मान पटकाविला. सर्व स्पर्धेतील विजेत्यांना ट्रॉफी भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.पी.पिसे, शिक्षक एन.एल. ठाकरे, एम.पी. मंदे, पी. एन. बारसागडे, राजकुमार चंदनखेडे विद्यालयातील शिक्षिका आर. पी. इरपाते, डी. डी. सुकारे, बी.एन.गोडे शिक्षकेतर कर्मचारी एस व्ही.गिरमकर, प्रशांत रामटेके, मोहन कुंभरे यांनी अथक परिश्रम घेतले.


