बिडीओ धनजंय साळवे
विसापूर येथे जि. प. हायस्कूलतर्फे सांस्कृतिक महोत्सव
बल्लारपूर : शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. शिक्षण क्षेत्रात स्पर्धा मोठी आहे. आजघडीला कान्वेंट संस्कृती मोठ्या प्रमाणात रूजली आहे. याकडे पालकांचा ओढा अजून आहे. परिणामी सार्वजनिक शिक्षण अडचणीत येत आहे. ही व्यवस्था बळकट झाली पाहीजे. पाल्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न शिक्षक करत आहे.शिक्षकांच्या प्रयत्नाला पालकांनी समर्थपणे साथ द्यावी, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी धनजंय साळवे यांनी विसापूर येथे केले.
. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल च्या वतीने स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक, सार्वजनिक मंचावर शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक महोत्सव दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी उदघाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वर्षा कुळमेथे होत्या.
. प्रमुख अतिथी म्हणून विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, उदघाटक गटविकास अधिकारी धनजंय साळवे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र लामगे,केंद्र प्रमुख नागेंद्र कुमरे,अभियंता रविंद्र चंदनखेडे,रोशन खोब्रागडे, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, हर्षाला टोंगे, प्रदीप गेडाम, सुरज टोमटे, विद्या देवाळकर, डॉ. सुनिल बुटले, मधुकर भोयर,अनिल टोंगे, मुख्याध्यापक दिनेश वरघणे आदींची उपस्थिती होती.
. दरम्यान जिल्हा परिषद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक संमेलनाच्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज, गोंडी नृत्य, लावणी नृत्य, देशभक्ती नृत्य, चित्रपट संगीत नृत्य सादरीकरण पालकांना व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल ला वेळोवेळी सहकार्य करणारे मधुकर भोयर,लक्ष्मी झाडे,जनार्धन पाटणकर, सुनिल नाकाडे,सुनिल पुणेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व पदक प्रदान करून गौरविण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक दिनेश वरघणे यांनी केले. संचालन शैलेश बरडे यांनी केले. यावेळी पालकांची व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


