अर्धवट बांधकामाने रहदारीस अडथळा
लोकप्रतींनिधींनी लक्ष देणे गरजेचे
भद्रावती : 32 कोटी खर्च करून केवळ थोड्याशा जमीन संपादनासाठी शहरातील विजासन येथील उड्डाणपूल अडकला असून जवळपास पूर्णत्वास आलेल्या या पुलाचे शेवटच्या टप्प्यातील बांधकाम बंद पडल्याने परिसरातील नागरिकांना विशेषता पावसाळ्याच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. जमीन मालक तथा कंपनी यांच्यात जमीन संपादनावरून तडजोड होऊ न शकल्याने सध्या या उड्डाणपुलाचे उर्वरित काम गेल्या तीन महिन्यापासून बंद पडलेले आहेत.
. मार्च 23 मध्ये आर के मदनी या कंपनीतर्फे या उडानपुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले. या उड्डाणपुलाचे बहुतेक काम पूर्ण झालेले आहे. मात्र शेवटचे अप्रोच साईडचे या पुलाचे बांधकाम अपूर्ण राहिले आहे. या अप्रोच साईड साठी आवश्यक असलेली थोडीशी जमीन मालक तथा कंपनी यांच्यात जमिनीच्या दरावरून तडजोड न झाल्याने हे काम शेवटच्या चरणात बंद पडलेले आहे. या उडान पुलापलीकडे देऊरवाडा, एकता नगर ,कुनाडा,माजरी चारगाव अशी गावे आहेत उडान पुलाजवळच एक पावसाळी वाहणारा लहानसा नाला आहे पावसाळ्यात या नाल्याचे पाणी तुंबून भरले की पलीकडच्या गावातील रहदारी बंद होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. सदर कंपनीने यात लोकप्रतिनिधी नी प्रत्यक्ष लक्ष घालावे अशी मागणी केली मात्र कंपनीला योग्य प्रतिसाद न मिळाल्याने बांधकामाचा तिढा कायम आहे. मात्र हे प्रकरण अगदी शेवटच्या चरणात अडकले असल्याने येणाऱ्या पावसाळ्यात नागरिकांना मनस्ताप होणार हे निश्चित आहे. सर्वसामान्य नागरिक या पुलाच्या पूर्ण बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे.
“आवश्यक असलेल्या जमिनीच्या दरावरून तडजोड होऊ न शकल्याने पुलाचे काम शेवटच्या चरणात बंद पडलेले आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्यास पुलाचे बांधकाम पूर्णत्वास जाऊ शकते. ” मो. तोसिक पटेल, प्रोजेक्ट मॅनेजर, आर .के. मदनी मुंबई.


