भद्रावती : फिमेल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेजच्या रासेयो विभागातर्फे जि. प. उच्च प्राथमिक शाळा, बोर्डा येथे आयोजित शिबिरामध्ये भारतीय संविधान व महिला सक्षमीकरण यावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
. याप्रसंगी प्रमुख अतिथी प्रा. डाॅ. इसादास भडके यांनी महिलांच्या संदर्भात संविधानाची भूमिका व महत्त्व सांगून महिलांच्या उन्नतीसाठी हिंदू कोड बिलाची माहिती दिली. प्रा. डाॅ. प्रमोद शंभरकर यांनी महिला सक्षमीकरणात भारतीय संविधानाची भूमिका व संविधानात अंतर्भूत कलमांची विस्तृत माहिती दिली.
. कार्यक्रमाप्रसंगी विचारमंचावर रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राजेंद्र बारसागडे, प्रा. डॉ. मेघमाला मेश्राम, प्रा. सुचिता धाबेकर, प्रा. सावधान उमक, प्रा. प्रज्ञा मेश्राम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या वाघमारे यांनी केले तर आभार तृप्ती दागमवार यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी,शिबिरार्थी विद्यार्थिनी, गावातील नागरिक उपस्थित होते.


