माजरी : भारतीय कोयला खदान मजदुर संघ वणी-माजरी व वेकोली मानव संसाधन विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय अभ्यास वर्ग दिनांक १८ व १९ जानेवारी ला क्षेत्रिय व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र माजरी या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन ए.पी.सिंग जी वेकोली प्रभारी व शंकर एडलावर यांच्या अध्यक्षतेत झाला. भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून व भारत मातेचा जयजयकार करीत अभ्यास वर्गाला सुरूवात झाली.
. उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी वेकोली आय आर प्रभारी ए.पी.सिंग यांनी औद्योगिक संबंध व आपली भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले. वेतन संबंधित या विषयावर विस्तृत माहिती पी.एस.रामटेके यांनी तर खान सुरक्षा या विषयावर क्षेत्रीय प्रशिक्षण अधिकारी अब्दुल कलाम शेख यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. कमलाकर पोटे सदस्य अ.भा.ख.म.संघ यांनी कल्याणकारी सुविधा यावर माहिती दिली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात डॉ. निखिल बुटले यांनी कामगार स्वास्थ संदर्भात महत्वाचे मार्गदर्शन केले. घरेलू जॉंच कारवाही या विषयावर दिलीप सातपुते सदस्य-हाय पॉवर कमिटी कोल इंडिया लिमिटेड यांनी मार्गदर्शन केले तर जोगेंद्र यादव-सदस्य वेकोली कल्याण बोर्ड यांनी सामाजिक सुरक्षा या विषयावर सर्व उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
. या दोन दिवसीय अभ्यास वर्गाला वेकोली माजरी क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या अभ्यास वर्गातील माहितीचा आपल्या जीवनात मोठा फायदा होणार असून भविष्यात इतर कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
. या अभ्यास वर्गाची सांगता दिनांक १९ जानेवारी ला झाली यावेळी दिलीप सातपुतेजी सदस्य-हाय पॉवर कमिटी कोल इंडिया लिमिटेड-, जोगेंद्र यादव सदस्य-वेकोली कल्याण बोर्ड, शंकर एडलावर, मंगेशअजमिरे, गुलाब चौधरी, गणेश चौधरी, गुरप्रीत सिंग, अब्दुल कलाम शेख व जगन्नाथ जेनेकर महामंत्री वणी-माजरी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी झालेल्या अभ्यास वर्गाचा सर्वांना फायदा होईल यासाठी सर्वांनी या ज्ञानाचा वापर इतरांसाठी होईल याचा प्रयत्न करावा असे आव्हान करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महेश श्रीरंग यांनी केले.
. या अभ्यास वर्गाच्या सफलतेसाठी डॉ तुरकर, संजय बावणे, संजय झाडे, निलेश सुर, आवारी, गजानन निमकर, लकी सिंग, नरेंद्र पिदुरकर, रंजिता झाडे तसेच सर्व कर्मचारी, पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.


