Home सामाजिक माना जमातीचे वतीने हळदी कुंकू कार्यक्रम तथा महिला मेळावा

माना जमातीचे वतीने हळदी कुंकू कार्यक्रम तथा महिला मेळावा

1143

वरोरा : वरोरा तालुका आदिवासी माना जमात विकास संस्थेच्या वतीने माणिका भवन वरोरा येथे हळदी कुंकू कार्यक्रम तथा महिला मेळावा हिल टॉप नगरी, वरोरा येथे उत्साहात पार पडला.

.     हळदी कुंकू सणानिमित्य वरोरा शहरातील माना जमातीच्या महिलांना एकत्र एकत्र वैचारिक देवाणघेवाण व्हावी,परस्पर आदरभाव स्नेहमीलन ,सामजिक ऐक्य याउद्देशाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात माणिकादेवी व सावित्रीबाई यांचे प्रतिमा पूजनाने मान्यवरांचे हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माया राजनहिरे यांनी भूषवले मंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.अश्विनी मगरे, प्रा. वर्षा जांभुळे, सुषमा दोहतरे उपस्थित होत्या.

.     कार्यक्रमादरम्यान महिला व मुलीचे आदिवासी नुत्य व गायन, भारुड, भजन, उखाणे सादर केले .मान्यवर पाहुण्याचे भाषण झाले त्यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू सणाचे महत्व, जमितीच्या रूढी परंपरा, चालीरीती आणि आधुनिकता, आजची आव्हाने आणि भूमिका इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.अध्यक्षीय भाषणात माया राजनहिरे यांनी माना जमातीच्या महिलांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन केले. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी एकमेकांना म्हणून वाण म्हणून भेट वस्तू आणि तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या.

.       कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रा काळमेंघ यांनी दिले. कार्यक्रमाचे संचालन अध्यापक मंगला दडमल यांनी केले. उपस्थितांचे आभार निता गजभे यांनी मानले. हळदी कुंकू कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला आणि कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व उपस्थित महिलांनी आणि आयोजकांनी परिश्रम घेतले. विशेष बाब म्हणजे वरोरा शहरात माणिका भवनात झालेला महिलांचा पहिलाच कार्यक्रम होता.

error: Content is protected !!