Home सामाजिक आज क्रांतिभूमीत शिक्षकेत्तर संघटनांच्या महामंडळाचे ५२ वे वार्षिक अधिवेशन

आज क्रांतिभूमीत शिक्षकेत्तर संघटनांच्या महामंडळाचे ५२ वे वार्षिक अधिवेशन

1157

पत्रकार परिषद माहिती

हजारो कर्मचारी राहणार उपस्थिती

पंकज रणदिवे

   नेरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांच्या महामंडळाचे ५२ वे वार्षिक अधिवेशन शाहिद बालाजी सभागृह पिंपळ रोड, चिमुर, जिल्हा. चंद्रपूर येथे सकाळी ११ वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती शनिवारी बालाजी मंदिरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या ५२ व्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतून शाळांमधील हजारो शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होणार आहेत.

.       पुढील काळात शिक्षकेतर कर्मचारी आणि त्याचे कुटुंब वाचले पाहिजे कोणताही अन्याय न होता त्याच्या सेवेला संरक्षण मिळाले पाहिजे या ध्येयाने महामंडळाची वाटचाल सुरू असल्याची माहिती सहकार्यवायक शिवाजी खांडेकर यांनी आज पत्रकार परिषद दिली.

.       गेली अनेक वर्षे राज्यातल्या शिक्षकेतर बांधवांच्या अजूनही काही रास्त मागण्या प्रलंबित आहेत, यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बक्षी समितीने खंड १ मध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मंजूर केलेला १०/ २०/३० च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ लागू करण्यात यावी. शिक्षकेतरांनी सेवेत असताना आपली शैक्षणिक पात्रता वाढीवल्यास त्यास सर्व प्रकारच्या पदावर वेतन संरक्षनासह विनाअट सवर्ग बदलून मिळावा व पवित्र प्रणाली मधून वगळण्यात यावे. विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतरांच्या वेतन व वेतनश्रेणीस संरक्षण मिळावे. महाराष्ट्र विधान परिषदेतील शिक्षक आमदार निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्याचा अधिकार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळावा. चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांची पदे कंत्राटी पद्धतीने न भरता ती पुर्वीप्रमाणे शासन नियुक्त मान्यता प्राप्त असावीत. माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या मागण्यांसाठी सध्या शिक्षकेतर कर्मचारी लढत आहेत.

.       महामंडळाच्या वतीने राज्यात येणाऱ्या काळात मोठ्या प्रकारचे आंदोलन हाती घेण्याचा विचार संपूर्ण शिक्षकेतर बांधवांच्या मनात आहे. या प्रश्नांवर आणि येणाऱ्या विषयावर रविवारी खुले अधिवेशन व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. दिवसभर चालणाऱ्या या अधिवेशन आणि चर्चासत्रासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे, शालेय शिक्षण राज्यमंत्री, डॉ. पंकज भोयर आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहेत. या अधिवेशनाचे आयोजन चंद्रपूर जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेला महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, कार्याध्यक्ष मोरेश्वर वासेकर, विनोद गोरे पुणे जिल्हा अध्यक्ष,प्रशांत हजारें चंद्रपूर जिल्हा सचिव आदी पदाधिकारी उपस्थिती होते.

error: Content is protected !!