प्रथम व द्वितीय धान विक्रेता शेतकर्याचा सन्मान
नेरी : आदिवासी विकास महामंडळ नाशिक उपप्रादेशिक कार्यालय चिमुर च्या मार्फतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. डोमा र.नं. ८०९ या संस्थेमध्ये आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ दि १६ जानेवारी संस्थेचे अध्यक्ष दशरथ नन्नावरे तसेच संचालक मंडळ यांचे हस्ते करण्यात आला.
. प्रथम धान विक्रेता शेतकरी मारोती नीलकंठ सेलोरे व दुसरे धान विक्रेता शेतकरी प्रभू कवडू लांजेवार यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी धान खरेदीला सुरुवात करण्यात आली. व धान मोजणी करण्यासाठीं इलेक्ट्रॉनिक वजन काटाच्या माध्यमातून खरेदी सुरू असल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दशरथ नन्नावरे, संस्थेचे संचालक नामदेव चौधरी, हरिभाऊ सातपुते, तुळशीराम नन्नावरे, शंकर भरडे, आनंदराव गरमडे, सखाराम सावसाकडे, शशिकला श्रीरामे, तसेच ग्रामपंचायत सदस्य विकास लांजेवार, ग्र. प. लिपिक रमेश दहिकर, संस्थेचे व्यवस्थापक रणदिवे, लिपिक दयाराम भरडे तथा शेतकरी उपस्थित होते.
. यावेळी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला धान शासकीय दराने विकण्याकरिता संस्थेत आणावा असे आवाहन संस्थेद्वारे करण्यात आले. व सर्व उपस्थितांना अल्पोहार देऊन उद्घाटन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


