22 शाळांनी नोंदविला सहभाग
नेरी : चिमूर तालुक्यातील उसेगाव येथे नेरी व खांबाडा केंद्रातील 22 शाळांच्या सहभागाने तीन दिवसीय बीटस्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक संमेलन उत्साहात संपन्न झाले.
. या दरम्यान सांस्कृतिक स्पर्धा घेण्यात आली. यात ऐकलं नृत्य, समूह नृत्य, नाटिका प्रयोग सादर करण्यात आले होते, तसेच खेळात कबड्डी, खो खो, रनिंग, लांब उडी असे अनेक खेळाचे प्रकार घेण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात बक्षिसे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला निखिल चाफले उपसरपंच ग्रा प उसेगाव अध्यक्ष गंगाधर ननावरे अध्यक्ष शाळा समिती तर प्रमुख अतिथी म्हणून प्रवीण कामडी, गणेश कामडी माजी सरपंच, शिगाल पाटील सामाजिक कार्यकर्ता उपस्थित होते या स्पर्धेत काजलसर येथील जी प शाळेच्या चमूने प्रथम पारितोषिक मिळवीले.


