गावकऱ्यांना दिला स्वच्छतेचा संदेश
सरदार पटेल महाविद्यालयाचे आयोजन
बल्लारपूर : तालुक्यातील विसापूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसाचे शिबीर घेतले आहे.‘डिजिटल साक्षरतेसाठी भारतीय युवाशक्ती’ सदर विशेष शिबिराच्या माध्यमातून रासेयोच्या विद्यार्थ्यांनी विसापुरात मिरवणूक काढून संविधानाचा जागर केला. दरम्यान गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देखील दिला.
. चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय सेवा योजना शिबीर शनिवार पासून सुरु आहे.दरम्यान रासेयोच्या विद्यार्थ्यांनी विसापूर मध्ये संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मिरवणुकीच्या माध्यमातून संविधानाचा जागर केला. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देखील दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, महात्मा ज्योतिबा फुले ,छत्रपती शिवाजी महाराज, ग्रामपंचायत परिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात स्वच्छता अभियान राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला.
. संविधान सन्मान मिरवणूक व स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या मिरवणुकीचे नेतृत्व सरदार पटेल महाविद्यालयाचे रासेयोचे विभागीय समन्वयक डॉ. कुलदीप गौंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरूषोत्तम माहोरे, डॉ. वंदना खनके, डॉ. राजकुमार बिरादार, डॉ. निखिल देशमुख यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचा सहभाग घेतला.


