Home सामाजिक समाजकार्य विद्यार्थ्यांचा समाज कल्याण अधिकारींशी संवाद 

समाजकार्य विद्यार्थ्यांचा समाज कल्याण अधिकारींशी संवाद

1162

जागृत संस्थेतर्फे क्षेत्रकार्य अंतर्गत उपक्रम 

चंद्रपूर : सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे क्षेत्र कार्य संस्थेत सुरू आहे. जागृत संस्थेच्या वतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयात विद्यार्थ्यांनी भेट दिली. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

.       समाजकार्याच्या विद्यार्थ्यांत आदर्श समाज घडवण्याची ताकद आहे. तुमच्यात जर सामाजिक जाणीवा, बांधिलकी, आपुलकी, संस्कार नसेल तर आपले शिक्षण आणि मिळणारे पद हे देखील व्यर्थ ठरते. त्यामुळे शिक्षणातून चांगला माणूस तयार व्हावा, या हेतूने विद्यार्थी दशेतच आपण परिश्रम घ्यावे व यश मिळवावे असे मार्गदर्शन जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. यावेळी समाज कल्याण विभागातील विविध शासकीय योजनांची माहिती पुस्तिका त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भेट दिली.

.    प्राचार्य डॉ. जयश्री कापसे, डॉ. देवेंद्र बोरकुटे व जागृत संस्थेचे संचालक अविनाश पोईनकर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी समाज कल्याण अधिकारींशी संवाद साधला. यावेळी समाज कल्याण अधिकारी कार्यालयात आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत समाज परिवर्तनासाठी सज्ज व्हा असे मार्गदर्शन केले. जागृत संस्थेतर्फे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांना संविधानाची उद्देशिका भेट देण्यात आली.

.     यावेळी प्रथम वड्डे, सौरव मेश्राम, विक्रम लटारे, राहुल पुंगाटी, संजीवनी राऊत, स्वाती साखरकर, माधुरी करमरकर, अश्विनी वड्डे, वर्षा कोडापे, सुमेध बक्षी, माधुरी वडस्कर, स्मिता चिकटे, शितल पेंदोर, मोनिका गावतुरे, सुमित काकडे आदी विद्यार्थी उपस्थित होते. जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनंजय साळवे हे बैठकीत व्यस्त असताना देखील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कार्यालयात विशेष वेळ देत मार्गदर्शन केले, त्यामुळे विद्यार्थी-अधिकारी संवाद चांगलाच रंगला. विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच कार्यालयात समाज कल्याण अधिकारी यांचेसोबत बसून त्यांच्याशी संवाद साधल्याने आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!