Home सामाजिक चंदनखेडा येथे तालुका स्तरीय विविध क्रिडा स्पर्धा

चंदनखेडा येथे तालुका स्तरीय विविध क्रिडा स्पर्धा

1179

भद्रावती : नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व शौर्य क्रिडा मंडळ बिरसा मुंडा आदिवासी पुरुष बचत गट चंदनखेड़ा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन दिनांक 10 जानेवारी व 12 जानेवारी 2025 ला आयोजित केले आहे. नरवीर तानाजी क्रिडोधान, चंदनखेडा च्या पटांगणात शुक्रवार 10 जानेवारी ला सायंकाळी 6 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर चे माजी संचालक रविंद्र शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर चे माजी सभापती दिनेश चौखारे, माजी उपसरपंच तथा समाजपरिवर्तक विठ्ठल रामकृष्ण हनवते, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती चे संचालक अनिल चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

.     या विविध क्रिडा स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत चंदनखेडा चे सरपंच नयनराव जांभुळे, उपसरपंच्या चंदनखेडा भारती उरकांडे राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य मारोती गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्या वनिता जांभूळे, माजी उपसरपंच डेव्हिड बागेसर, माजी उपसरपंच चंद्रशेखर निमजे, सामाजिक कार्यकर्ते किशोर निखार, प्रभाकर दोडके, सिंगलदिप पेन्दाम, तं.म.स. अध्यक्ष मनोहर हनवते, पोलिस पाटील समिरखान पठाण, गुलाब भरडे, विकास दोहतरे, गजेंद्र रणदिवे, राहुल मालेकर, फिरोज पठाण, नंदकिशोर हनवते, प्रकाश सोनुले, मंगेश हनवते, निकेश पाठक, लता नत्रावरे, अमृताताई कोकुळे उपस्थित राहणार आहे.

.     या विविध क्रिडा स्पर्धेमध्ये नियम राहणार आहे.  नशा पाणी घेऊन येणार्या संघास बाद केले जाईल. खेडाळूला दुखापत किंवा जिवितहानी झाल्यास आयोजक मंडळ जबाबदार राहणार नाही. पंचाचा निर्णय अंतिम राहील. काही नियम वेळेवर जाहीर करण्यात येईल.

error: Content is protected !!