Home सामाजिक बल्लारपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

बल्लारपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

1215

कीर्तनातून ग्रामगीतेचा दिला संदेश

पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी औक्षण

बल्लारपूर : बल्लारपूर तालुका अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्य बल्लारपूर येथील विश्वकर्मा भवन, सार्वजनिक हनुमान मंदिर, विवेकानंद वार्डात शनिवार व रविवार ला कार्यक्रम पार पडला.

.      यावेळी घेण्यात आलेल्या गुरुकुंज मोझरी येथील आकाश तावीडे महाराज यांच्या कीर्तनातून ग्रामगीतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमस्थळापासून निघालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले. यावेळी भजन मंडळीचा सहभाग होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शनिवार च्या कार्यक्रमात भजन संमेलन दरम्यान विविध २२ भजन मंडळाच्या गायक कलावंतांनी सहभाग घेतला.

.       भजनातील गायक कलावंतांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला अनुसरून भजनाच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली. यावेळी गुरुदेव भक्तांनी संतांच्या कार्याची माहिती करून घेतली.
रविवारी सकाळी ९ वाजता कार्यक्रम स्थळावरून पालखी मिरवणूक प्रारंभ करण्यात आली. ही मिरवणूक शहरातील मुख्य मार्गांनी गुरुदेव भक्तांचे लक्ष वेधून मार्गक्रमण करीत होती. दरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेची निघालेल्या पालखी मिरवणुकीचे ठिकठिकाणी गुरुदेव भक्तांनी औक्षण केले. या मिरवणुकीत शेकडोवर गुरुदेव भक्तांचा सहभाग होता. भजन दिंडी आणि ढोल ताशांच्या गजरातील पालखी मिरवणूक व शोभायात्रा नागरिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. सामुदायिक प्रार्थना व महाप्रसादाचे वितरण करून पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप करण्यात आला.

.     राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बल्लारपूर तालुका अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सेवाधिकारी भास्कर डांगे, अध्यक्ष दिपक मेश्राम, तालुका महिला प्रमुख अरूणा डांगे, महेंद्र कोडापे, भैयाजी त्रिंबके,रामभाऊ पेटकर, श्रावण बानासुरे,ओंकार कलसारे,बापु ठाकरे, गुणवंत शिडाम,कल्याण कठाणे,रोहित कोडापे, बाळकृष्ण डांगे आणि गुरुदेव भक्तांनी सहकार्य केले.

error: Content is protected !!