कुचना : भरारी महिला ग्राम संस्था व भारतीय ग्रामीण विद्यालय कुचना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय ग्रामीण विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय ग्रामीण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका काळे व प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा आशा ताजने, कुचना सरपंच सुचिता ताजने, पोलीस पाटील योगिता बंड, कुचना गावचे ज्येष्ठ नागरिक देवराव अवतरे व भारतीय ग्रामीण विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व गावातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते. प्रथमता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व सावित्रीबाई फुले यांचे स्त्री यांच्या उत्थानासाठी किती मोलाचे कऱ्य केले हे सर्व मान्यवराच्या भाषणातून सांगण्यात आले.
. महिलांना चुल व मूल या परंपरेतून बाहेर काढून स्त्रियांना खरा शिक्षणाचा अधिकार सावित्री बाई फुले यांनी दिला. तेव्हा महिलांच्या जीवनाची खरी भाग्यविधाता असून महिलांना शिक्षणाचा हक्क मिळून देण्यासाठी त्याकाळात कसा त्रास त्यांना सहन करावा लागला यांची माहिती यावेळी शाळेतील मुलींनी दिली. कार्यक्रमाचे संचालन शाळेतील विद्यार्थिनी अपर्णा खंडाळकर हिने केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रुतिका मडावी हिने केले.


