Home सामाजिक नवेगाव हुंडेश्वरी येथें सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

नवेगाव हुंडेश्वरी येथें सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

1204

नागभीड : महात्मा ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दांपत्य अतिशय विषम परिस्थिती असतांनाही त्या काळात हिमालयासारखे मुलींच्या शिक्षणासाठी उभे राहिले व महिलांसाठी असलेल्या वाईट प्रथांविरोधात आवाज उठवीत क्रांतीची ज्योत पेटवली. फुले दांम्पत्यांनी विषमता दुर करीत समतेचे बीज रोवले, त्याची फळे आज आपण चाखत आहोत हे त्यांचे उपकार समाज कधीच विसरू शकणार नाही असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्य संजय गजपुरे यांनी नवेगाव हुंडेश्वरी येथील सावित्रीबाई फुले जयंती महोत्सवात केले.

.      माळी समाज संघटना, नवेगाव हुंडेश्वरीच्या वतीने आयोजित या महोत्सवात संजय गजपुरे यांच्यासह ब्रम्हपुरीच्या डॅा. प्रा. पुनम घोरमोडे, नागपूरचे ओबीसी विचारवंत विशेषजी फुटाणे, सरपंच कल्लु नेवारे, माजी सरपंच चंद्रकला राऊत , पोलीस पाटील शारदा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यात समाजप्रबोधनाच्या दृष्टीने उपस्थितांनी विचार व्यक्त केले.

.      यावेळी  घोरमोडे व फुटाणे यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांनी दिलेल्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता सामुहीक गावभोजनाने करण्यात आली. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी दादाजी सोनुले, गणेश गुरनुले, राजुभाऊ सोनुले, शेखर उरकुडे इत्यादी समाजबांधवांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला परीसरातील नागरिक व समाजबांधवांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!